Student’s Message
मी तीन वेळा अपयशी झालो होतो. शेवटी राजे शिवाजी करिअर ॲकेडमीमध्ये प्रवेश घेतला. येथे मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच माझा आत्मविश्वास परत आला. शारीरिक प्रशिक्षण, मार्गदर्शन, अभ्यासाची शिस्त – सगळं काही इथे परिपूर्ण आहे. आज मी सेवेत आहे, याचं पूर्ण श्रेय या अकॅडमीला आहे.
"यशाचा आत्मविश्वास येथे मिळाला!"
– श्रीकांत उमाजी राऊत, सोल्जर टेक्निकल
एक मुलगी म्हणून सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण जेव्हा मी अकॅडमी बघितली – मुलींसाठी स्वतंत्र निवास, सीसीटीव्ही व्यवस्थापन आणि महिला प्रशिक्षक – त्यामुळे मी निश्चिंत झाले. आज मी भरती झाले आणि हे स्वप्न सत्यात उतरले. धन्यवाद, राजे शिवाजी करिअर ॲकेडमी!
"मुलींसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण"
– ऋतिका कोकाटे, आर्मी टेक्निकल
येथे आल्यावर मला समजले की माझ्यामध्ये काय कमतरता आहेत आणि त्यावर काम कसे करायचे. प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शक शिक्षक माझ्या सोबत होते. अभ्यास, धावणे, व्यायाम – सगळं शिस्तबद्धपणे. आज मी जे काही आहे, त्याचे खरे श्रेय याच प्रशिक्षणाला.
"मी स्वतःला ओळखू शकलो!"
– सागर रणदिवे, आर्मी टेक्निकल
एक वेळ अपयश आलं, पण सरांनी मला धीर दिला, आणि परत तयारीस सुरुवात केली. सलग १८ महिन्यांच्या मेहनतीनंतर मी भरती झाली. हे सर्व शक्य झाले ते फक्त या अकॅडमीमुळेच. इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडतं, हे मी अनुभवलेलं सत्य आहे.
"अपयशातून यशाकडे प्रवास"
संतोष मारुती कोडगे, नर्सिंग असिस्टंट
माझ्या आई-वडिलांनी शेतात काम करून मला इथे पाठवलं. मी त्यांच्या त्यागाचे चीज केले. राजे शिवाजी अकॅडमीमुळे माझं आयुष्य उजळून निघालं. इथे मिळालेल्या प्रेरणेने मी नोकरी मिळवली आणि माझ्या घराचं भविष्य घडवलं.
